प्रस्तावना

आमचे गुरु अण्णा ह्यांच्या विषयी आम्हाला कुतूहल होतं कि, ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कसे आले. त्यांचं राहणीमान आम्हाला इतर माणसापेक्षा वेगळं वाटलं. कधी कधी एकदम बोलता बोलता ते ध्यानात जातात. इतर माणसांपेक्षा हि व्यक्ती वेगळी आहे हे आम्हाला जाणवलं. काही भक्तांचा असा विचार झाला कि, आपण अण्णांच्या अनुभवांवर आधारित चरित्र लिहू या. ह्या कलियुगामध्ये लोकांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून पुस्तक लिहिण्यासाठी अण्णांनी आम्हाला आशीर्वाद दिला. ते म्हणाले कि, हे कार्य लोकल्याणासाठी करा. व्यावसायिकपणा आणू देऊ नका असे त्यांचे स्पष्ट मत आहे. ई. स. २०२० वैशाख शुक्ल एकादशीला चरित्र लिखाणाची सुरुवात झाली

मराठी